कांदा भजी...
माझ्या आवडीच्या स्ट्रीट फूड मध्ये कांदा भाजी ला सर्वात वरच स्थान आहे. आमच्या सातारा मध्ये NH 4 हायवेलागत बॉंबे रेस्टॉरंट चौकात मिळणारी कांदा भजी माझ्या मते सर्वोत्कृष्ट आहेत. आपण कधी आलात तर अवश्य ट्राय करून बघा,तुमची निराशा होणार नाही
आता वळूया कांदाभजी कडे. इथल्या कांदा भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून एकदम कुरकुरीत आणी आतून एकदम सॉफ्ट. एका प्लेट मध्ये 4 भजी आणी दोन पाव दिले जातात.मला ही भजी आवडत असल्या कारणाने मी एकावेळी 2प्लेट म्हंटल तरी हादडतो. मी इतर ही ठिकाणी कांदा भजी खाली आहेत पण या ठिकान च्या भाज्यांमध्ये जी चव आहे ती मला कुठेच मिळाली नाही. शिवाय इथल्या भज्या मध्ये कांद्याचं प्रमाण ही जास्त असल्याने ही भजी कुरकुरीत असतात. बाकीच्या ठिकाणी नावाला कांदा असतो किंवा कोबी मिक्स भजी दिली जातात, जी मला अजिबात आवडत नाहीत. चार पैसे ज्यादा घ्या पण कांदाच द्या असं माझं म्हणणं आहे. गेली 5/6 वर्ष झाली मी या ठिकाणी भजी खातोय पण चवीत कसलाही बदल मला अजून जाणवला नाही. कमवरून सुटल्यावर बस ची वाट बगत असताना गरम तळलेल्या भाज्यांचा वास आला की पावलं आपोआप इकडं वळतात, आणी मग एक प्लेट खाऊन एक प्लेट पार्सल घेतल्याशिवाय पाय निघत नाही.आणी इथला दरही माफक आहे 25 रु प्लेट. इथला अजून एक किस्सा म्हणजे मागे कांद्यचे भाव गगनाला भिडले होते(100/150₹kg) तरी इथंल्या गाडीवर भजी मिळत होती. आणी प्युअर कांदाच वापरलेली कांदा भजी मिळत होती. इथल्या कांदा भजी चा दर्जा यांनी अजून मेंटेन केला आहे. आणी म्हणूनच मला या ठिकाणाबद्दल विशेष प्रेम आहे.
कांदा भजी व्यतिरिक्त या ठिकाणी बटाटे भजी आणी वडापाव ही उत्तम मिळतो तो ही एकदा टेस्ट करून बघाच. वडापाव तर दोन खाल्ले की दिवसभर भूक लागणार नाही. वड्याची साईझ पण मोठी असते आणी सोबत मिळणारा पाव ही एकदम ताजा आणी मऊ लुसलुशीत असतो, त्यामुळं खाण्याची लज्जत वाढते...
हा माझा पहिला फूड ब्लॉगआहे. आवडला असल्यास कमेंट मध्ये जरूर कळवा. आणी काही सूचना असतील तरी सांगा.सोबत माझ्या फेसबुक आणी इंस्टाग्राम पेजला लाइक आणी फ़ॉलो करायला विसरू नका. ©eat_with_akki