Monday, June 1, 2020

आठवणीतली पुरीभाजी...

              पुरी भाजी म्हंटल की डोळ्यासमोर येते ती बटाट्याची रस्सेदार भाजी आणी गोल गरमागरम, तळलेल्या मऊसूद पुऱ्या. पुरी भाजी हा माझा लहानपानापासूनचा आवडता पदार्थ. पुरीभाजी हा मी घराबाहेर हॉटेलात खाल्लेला माझा पहिला पदार्थ. या पुरीभाजी सोबत माझ्या खूपसाऱ्या आठवणी आहेत.  माझ्या लहानपणी आमचं कोरेगांव शहारा(सातारा) मध्ये छोटेखानी हार फुले विकण्याचं दुकान होत. रविवारी वडिलांना मदत म्हणून मी दुकानावर जात असे. सकाळी रतिबाचे हार वाटून झाल्या नंतर वडिलांकडून नाश्ता करणार का? असं विचारल्यावर मी लाजून हो म्हणत असे. मग वडील शेजारच्या आनंद भुवन या उडप्याच्या हॉटेल मध्ये मला घेऊन जात. या हॉटेल मधेही आमचे हार दिले जातं असल्यामुळे हॉटेल चा मालक आणी वडील यांची ओळख होतीच. मला हॉटेल मध्ये सोडून, याला काय पाहिजे ते द्या रे, अस त्या गल्ल्यावरच्या मालकाला सांगून वडील दुकानावर जात असत. मग माझ्या समोर मोठा प्रश्न पडत असे काय मागवावे. माझी नजर हॉटेल च्या भिंतीवर टांगलेल्या दरपत्रकावर वरून खाली पर्यंत नेली आणी काहीतरी नवीन खायचं म्हणून  मी पुरी भाजी ची ऑर्डर दिली.. 
        ऑर्डर दिल्यानंतर दहा मिनिटातच वेटर माझी पुरीभाजी घेऊन माझ्या समोर हजर झाला. क्षणभर ती पुरीभाजीची प्लेट बघून मी दचकलोच. कारण चार मोठया पुऱ्या आणी भरपूर भाजी हे मला काही संपणार नव्हतंच. पण तरी मी फार वेळ न घालवता पुरीभाजी खाण्यासाठी सुरवात केली. पुरी भाजी चा पहिला घास तोंडात टाकताच मला हा पदार्थ खूप आवडला. गरम गरम मऊ पुऱ्या आणी अशी मसालेदार बटाट्याची भाजी मी पाहिलांदाच खाल्ली होती. सोबत कांदा आणी लिंबू ही त्याची लज्जत वाढवत होते. सुरवातीला ही पुरीभाजी संपले की नाही अशी काळजी असताना मी ती पुरीभाजी अक्षरशा चाटून पुसून खाल्ली. घरी आल्यानंतर मी हॉटेल मध्ये पुरीभाजी खाऊन आलोय अशी फुशारकी की मी माझ्या मोठया बहिणीला मोठया अभिमानाने सांगतं असे. पुढं कॉलेज ला गेल्यावर ही मित्रांबरोबर हॉटेलात गेल्यानंतर पुरीभाजी हिच फेव्हरेट डिश झाली होती. काही काळानंतर ते हॉटेल बंद झालं, पण पाहिलांदा खाल्लेली पुरीभाजी आणी तिची अप्रतिम चव आजही जिभेवर तशीच आहे... 
ब्लॉग आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. सोबत माझ्या eat with akki satara या फेसबुक पेजला आणी इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. 

Thursday, May 28, 2020

कांदा भाजी

कांदा भजी...
माझ्या आवडीच्या स्ट्रीट फूड मध्ये कांदा भाजी ला सर्वात वरच स्थान आहे. आमच्या सातारा मध्ये NH 4 हायवेलागत बॉंबे रेस्टॉरंट चौकात मिळणारी कांदा भजी माझ्या मते सर्वोत्कृष्ट आहेत. आपण कधी आलात तर अवश्य ट्राय करून बघा,तुमची निराशा होणार नाही 
आता वळूया कांदाभजी कडे. इथल्या कांदा भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून एकदम कुरकुरीत आणी आतून एकदम सॉफ्ट. एका प्लेट मध्ये 4 भजी आणी दोन पाव दिले जातात.मला ही भजी आवडत असल्या कारणाने मी एकावेळी 2प्लेट म्हंटल तरी हादडतो. मी इतर ही ठिकाणी कांदा भजी खाली आहेत पण या ठिकान च्या भाज्यांमध्ये जी चव आहे ती मला कुठेच मिळाली नाही. शिवाय इथल्या भज्या मध्ये कांद्याचं प्रमाण ही जास्त असल्याने ही भजी कुरकुरीत असतात. बाकीच्या ठिकाणी नावाला कांदा असतो किंवा कोबी मिक्स भजी दिली जातात, जी मला अजिबात आवडत नाहीत. चार पैसे ज्यादा घ्या पण कांदाच द्या असं माझं म्हणणं आहे. गेली 5/6 वर्ष झाली मी या ठिकाणी भजी खातोय पण चवीत कसलाही बदल मला अजून जाणवला नाही. कमवरून सुटल्यावर बस ची वाट बगत असताना गरम तळलेल्या भाज्यांचा वास आला की पावलं आपोआप इकडं वळतात, आणी मग एक प्लेट खाऊन एक प्लेट पार्सल घेतल्याशिवाय पाय निघत नाही.आणी इथला दरही माफक आहे 25 रु प्लेट. इथला अजून एक किस्सा म्हणजे मागे कांद्यचे भाव गगनाला भिडले होते(100/150₹kg) तरी इथंल्या गाडीवर भजी मिळत होती. आणी प्युअर कांदाच वापरलेली कांदा भजी मिळत होती. इथल्या कांदा भजी चा दर्जा यांनी अजून मेंटेन केला आहे. आणी म्हणूनच मला या ठिकाणाबद्दल विशेष प्रेम आहे. 
   कांदा भजी व्यतिरिक्त या ठिकाणी बटाटे भजी आणी वडापाव ही उत्तम मिळतो तो ही एकदा टेस्ट करून बघाच. वडापाव तर दोन खाल्ले की दिवसभर भूक लागणार नाही. वड्याची साईझ पण मोठी असते आणी सोबत मिळणारा पाव ही एकदम ताजा आणी मऊ लुसलुशीत असतो, त्यामुळं खाण्याची लज्जत वाढते... 

हा माझा पहिला फूड ब्लॉगआहे. आवडला असल्यास कमेंट मध्ये जरूर कळवा. आणी काही सूचना असतील तरी सांगा.सोबत माझ्या फेसबुक आणी इंस्टाग्राम पेजला लाइक आणी फ़ॉलो करायला विसरू नका.  ©eat_with_akki