पुरी भाजी म्हंटल की डोळ्यासमोर येते ती बटाट्याची रस्सेदार भाजी आणी गोल गरमागरम, तळलेल्या मऊसूद पुऱ्या. पुरी भाजी हा माझा लहानपानापासूनचा आवडता पदार्थ. पुरीभाजी हा मी घराबाहेर हॉटेलात खाल्लेला माझा पहिला पदार्थ. या पुरीभाजी सोबत माझ्या खूपसाऱ्या आठवणी आहेत. माझ्या लहानपणी आमचं कोरेगांव शहारा(सातारा) मध्ये छोटेखानी हार फुले विकण्याचं दुकान होत. रविवारी वडिलांना मदत म्हणून मी दुकानावर जात असे. सकाळी रतिबाचे हार वाटून झाल्या नंतर वडिलांकडून नाश्ता करणार का? असं विचारल्यावर मी लाजून हो म्हणत असे. मग वडील शेजारच्या आनंद भुवन या उडप्याच्या हॉटेल मध्ये मला घेऊन जात. या हॉटेल मधेही आमचे हार दिले जातं असल्यामुळे हॉटेल चा मालक आणी वडील यांची ओळख होतीच. मला हॉटेल मध्ये सोडून, याला काय पाहिजे ते द्या रे, अस त्या गल्ल्यावरच्या मालकाला सांगून वडील दुकानावर जात असत. मग माझ्या समोर मोठा प्रश्न पडत असे काय मागवावे. माझी नजर हॉटेल च्या भिंतीवर टांगलेल्या दरपत्रकावर वरून खाली पर्यंत नेली आणी काहीतरी नवीन खायचं म्हणून मी पुरी भाजी ची ऑर्डर दिली..
ऑर्डर दिल्यानंतर दहा मिनिटातच वेटर माझी पुरीभाजी घेऊन माझ्या समोर हजर झाला. क्षणभर ती पुरीभाजीची प्लेट बघून मी दचकलोच. कारण चार मोठया पुऱ्या आणी भरपूर भाजी हे मला काही संपणार नव्हतंच. पण तरी मी फार वेळ न घालवता पुरीभाजी खाण्यासाठी सुरवात केली. पुरी भाजी चा पहिला घास तोंडात टाकताच मला हा पदार्थ खूप आवडला. गरम गरम मऊ पुऱ्या आणी अशी मसालेदार बटाट्याची भाजी मी पाहिलांदाच खाल्ली होती. सोबत कांदा आणी लिंबू ही त्याची लज्जत वाढवत होते. सुरवातीला ही पुरीभाजी संपले की नाही अशी काळजी असताना मी ती पुरीभाजी अक्षरशा चाटून पुसून खाल्ली. घरी आल्यानंतर मी हॉटेल मध्ये पुरीभाजी खाऊन आलोय अशी फुशारकी की मी माझ्या मोठया बहिणीला मोठया अभिमानाने सांगतं असे. पुढं कॉलेज ला गेल्यावर ही मित्रांबरोबर हॉटेलात गेल्यानंतर पुरीभाजी हिच फेव्हरेट डिश झाली होती. काही काळानंतर ते हॉटेल बंद झालं, पण पाहिलांदा खाल्लेली पुरीभाजी आणी तिची अप्रतिम चव आजही जिभेवर तशीच आहे...
ब्लॉग आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. सोबत माझ्या eat with akki satara या फेसबुक पेजला आणी इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.
No comments:
Post a Comment